गेले सहा महिने अवघ्या महाराष्ट्राच्या कानांचे प्राण बनलेल्या 'सारेगमप लिटल चॅम्प्स'च्या रविवारी सायंकाळी रंगलेल्या महाअंतिम फेरीत पाच ताऱ्यांमधून आळंदीच्या कातिर्की गायकवाड हिने महागायिका बनण्याचा किताब मिळविला.गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तमाम रसिकजनांच्या मनातले ताइत ठरलेल्या या 'पंचम' स्वरांमधून 'झी'च्या सारेगमप स्पधेर्तील महागायकाची निवड ही महाकठीण गोष्ट होती. अखेर महाअंतिम फेरीतून परीक्षकांनी एकमताने कातिर्कीच्या गळ्यात महागायिकेची माळ घातली. या पाच ताऱ्यांवरील रसिकजनांच्या अलोट प्रेमाची एसएमएसरूपी मोजदाद जाहीर न करण्याचे औचित्य आयोजकांनी दाखविले. कातिर्कीबरोबरच प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, मुग्धा वैशंपायन आणि आर्या आंबेकर या चौघांनीही महाअंतिम फेरीची लज्जत उत्तरोत्तर वाढतच ठेवली.गोरेगावच्या एसआरपी ग्राऊंडवर रंगलेल्या या सोहळ्यासाठी रसिकांनी तुडुंब गदीर् केली होती. या पाचही गायकांची निवड करणारे, गाण्याची लज्जत अनुभवणारे दिग्गज कलाकार, संगीतकार, अभिनेते यांची मांदियाळीच जमली होती. कातिर्कीला दोन लाख रुपयांचे बक्षिस मिळाले. तर अन्य चौघा महागायकांनाही प्रत्येकी एक लाख रुपयांच्या बक्षिसाने गौरविण्यात आले. परीक्षक अवधूत गुप्ते व वैशाली सामंत यांच्या हस्ते ट्रॉफी व राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांच्या स्वरूपातील बक्षीस देऊन त्यांना गौरविण्यात आले. 'झी'तफेर् संगीत शिक्षणासाठी प्रत्येकास दोन लाख रुपये इतकी रक्कमही यावेळी देण्यात आली.आशा खाडिलकर, संजीव अभ्यंकर, देवकी पंडित, श्ाीधर फडके, सुरेश वाडकर या मान्यवर परीक्षकांची पारख आणि ५० टक्के एसएमएसचा कौल यांच्यावर या महाअंतिम विजेते ठरले. सहा महिन्यांच्या या सूरमयी प्रवासाचे ऑडिओ-व्हिडिओ सीडी संच तसेच 'पंचरत्न' हा आल्बम रसिकांसाठी येणार आहे........आम्ही पाचही विजेते...' या यशावरच थांबू नका, असे सांगत शास्त्रीय संगीताचा पाया मजबूत करण्याचा सल्ला श्रीनिवास खळे यांनी दिला. कातिर्कीनेही 'विजेती मी एकटी नाही. आम्ही पाचही जण विजेते आहोत', असे म्हणत स्पधेर्त वेळोवेळी व्यक्त झालेल्या भावनेचाच पुनरुच्चार केला.
0 comments
Post a Comment