तु जवळ नाहीस तरीही
मी एकटा कधीच नसतो
तुझ्या अस्तित्वाचा गध
माझ्याभोवती दरवळत असतो
विरहाचे ऊन जाळते कधी
मनाची तगमग होते
तुझ्या डोळ्यातील शितलता
त्यावर ह्ळुच फुकर घालते
तुझ्या भेटीची ओढ
थन्डी होउन अन्गाला झोबते
तुझ्या आठवणी शाल होउन
पाघरुन घालीत उब देतात
स्नध्याकाळी,एकान्तवेळी
आठवणीचा वारा सुटतो
मझ्या प्रत्येक श्वासागणिक
तुझ्या केसाचा सुन्गध् येतो
होतो अबोल मग मी सुध्दा
अन् तुझ्यामधे रन्गुन जातो,
मी प्रेमात पडल्याच
प्रत्येक क्शण सान्गुण जातो...............
.अतुल पाटील
0 comments
Post a Comment