मित्रांनो आणि मैत्रिणिंनो ,ही कविता मी लिहीली नाही ,आपल्यात इतकी प्रतिभा असण शक्यच नाही ...

उशाला माझिया
उमले मोगरा
गंध दुलईत
तुझाच बाबरा

श्वासात बेभान
उन्माद कापरा
उन्माद कापरा
तुझाच नखरा

करात माझिया
लाजते अबोली
होऊनि बेधुंद
मिटते पापणी

माझिया गळ्यात
हार दो करांचा
हलके उघडी
पडदा लाजेचा

स्पर्शाने तुझिया
वणवा पेटतो
बेभान किनारा
नदीला भेटतो

डोळ्यात माझिया
सखे तुझा नूर
जातेस का दूर
लावून काहूर

थांब ना जराशी
ओसरू दे पूर
छेडून जा सखे
एकदाच सूर

-- क्षिप्रा

0 comments

Post a Comment