माझ्या कवीतांना रिप्लाय करा, माझा अहंकार सुखावतो
रिप्लाय नाही केला तर, माझा ग उगाच भुकावतो

माझी कवीता उत्कृष्ट आहे, इतरांची खैर नाही
असे प्रत्येकाला वाटले, त्यात काही गैर नाही

स्तुती करताना जरा तोंड भरून करा
टिका थोडीशीच, जरा हात आवरून करा

सत्य सांगताना थोडं ठासून सांगा
खोटं सांगताना थोडं हासून सांगा

मला चांगलं म्हणा, तुम्हाला चांगलं म्हणेल
मला वाईट म्हणा, तुमचे धाबे दणाणेल

मी महान आहे, शंका काढू नका
मी लाथा झाडेन, तुम्ही झाडू नका

माझ्या प्रतीभेची साक्ष, माझ्या घरी शारदा पाणी भरते
(शारदा नावाची मोलकरीण, आमच्या घरी भांडी धुणी करते)

माझी कवणे गा, तुमचे नगारे झडत जातील
माझ्याशी पंगा धेणारे, वार्‍यावर उडत जातील

हरीश दांगट
May 17, 2009

0 comments

Post a Comment