अव्यक्त माझे भाव अन् बोलणार तूही नाही !

दडवलय मी हे गुपित अन् खोलणार तूही नाही !



रमणीय सृष्टी,रंगली मैफल स्वर्गीय सुरांची !

निश्चल मी तरी अन् डोलणार तूही नाही !



लपवूनि अर्थ गहिरे; उधळले शब्द सारे !

न मोजले मी कधी अन् तोलणार तूही नाही !



भरलेला समोर हा प्याला; साखर सर्व तळाला !

प्यालो मी तसाच् अन् घोळणार तूही नाही !



हा अबोल दूरावा भासे जणु वैषाखाचा वणवा !

थंड आहे मी तरी अन् पोळणार तूही नाही !



क्षणोक्षणी तुझेच् स्मरण; आलो कधी चुकून समोर॥

नजर मी चुकवेन; अन् ओळखणार तूही नाही !



-परीक्षित

0 comments

Post a Comment