सये...
आता तुझा प्रत्येक क्षण माझ्या अस्तित्वापासुन दूर असेल...
वर वर तु निश्चिंत असशील...पण मनात मात्र दुःखांचा पुर असेल...!
कही दिवसांनंतर हा पुर ओसरेल...
कुठल्यातरी बेसावध क्षणी ... पुन्हा पाऊस घसरेल...
पुन्हा कुणीतरी आवडू लागेल... पुन्हा डोळे झुरतील
मनात मात्र तुझ्या तेंव्हा... माझेच ऊसासे असतील...
वाट बघ॥ प्रेमाची भावना पुन्हा उफाळुन येते का?...
त्या क्षणी नकळत का होईना॥बघ माझी आठवण येते का?
किंवा कदचित असेही होईल...तुला एखाद स्थळ सांगुन येईल
दोन्ही घरची बोलणी होतील...दोन्हीकडुन होकार असेल...
घरात जरी हो म्हंटलस्...तरी मनात तुझ्या नकार असेल...
मनं पुन्हा दुबळ होईल...स्वतःची बाजू मांडायला...
अपयशी ठरल म्हणून 'वेड'॥तुझ्यशीच लागेल भांडायला
भांडण मिटेपर्यंत कदाचित॥अंगावरती हळद चढेल..
आपण नक्की काय करतोय॥तुझ्या मनाला कोडं पडेल
सनईच्या सुरांवर॥ वाजंत्र्यांच्या तालावर..नव्या घरात प्रवेश होईल
पायान माप ओलांडताना मात्र मनाला क्लेश होईल
क्लेश होउ देऊ नकोस॥असेल त्याचा स्विकार कर..
"तुझ्यावर आता जबाबदारी आहे"॥याचाही तेंव्हा विचार कर।
अंगावरची हळद आता बघ हळुहळु उतरते का॥
पिवळ्या पाण्याकडं लक्ष गेल तर बघ॥ माझी आठवणं येते का?..
दिवसांमागुन दिवस जातील॥वर्षां मागुन वर्षे जातील
नव्या आयुष्यामध्ये पुन्हा॥नवी नाती निर्माण होतील..
नव्या नात्यांच्या नवेपणात॥आपल नात जुन होईल..
नात्याप्रमाणेच हळुहळु॥मनसुध्दा सुनं होईल..
माझ्या सुन्या मनात मात्र॥फक्त तुचं उरशील..
माझ्यासारखीच॥एक दिवस..तु सुध्दा झुरशील..
बघ॥ एखादी पाऊलवाट तुला..माझ्या आठवणींकडे नेते काय..?
बघ॥सुकल्या झाडाला.. नव्याने पालवी फुटते काय?
आयुष्याच्या अंतापर्यंत निदान॥ निखळ "मैत्री" तरी उरते काय?
आणि आयुष्यात॥एकदा तरी..."बघ माझी आठवण येते का?"
मित्रहो मी काही कवी नाही पण चांगल्या कविता जमा करण्याचा एक छंद आहे त्यातीलच ही एक कविता..
|
0
comments
]
0 comments
Post a Comment