"तसं पहायला गेलं तर माझ्यासाठी काहीच बदललेलं नसतं। . ."
मळकटलेल्या त्या कालनिर्णयची पानं,
बर्र्याच दिवसांपासुन पलटायची विसरलेली असतात
अन ॠतुत झालेले ते किंतिचसे बदलही,
उगाचचं फुटक्या कौलातून आत डोकावत राहतात। . .
कधी थंडी शिरते हळूच आत। . .उबारा शोधायला
तर कधी बरसुन जातो ढगं। . . थोडंसं कोरडं व्ह्यायला
अवखळ असा एक कवडसा, दिवसाउजेडी घरात शिरतो
दिवस मावळता तोही बेचारा, मला एकट्याला सोडुन जातो। . .
रात्री मात्र थोडे बदल नक्कीच जाणवायला लागतात
कुस बदलल्यावर थोड्या चांदण्या, जेव्हा खिडकीबाहेर दिसायला लागतात
तिकडे मग दुर्लश्य करुन, नुसतंच कुस बदलतं राहायचं,
उमलु लागलेल्या तिच्या स्वप्नाला दचकून सारखं जागं करायचं। . .
कित्येक दिवस झाले असतील त्या घटनेला,
पण काल अजून जणू तिथेच गोठलेला असतो
अन तिला भेटायचो तिथला वडंही आता,
ॠतुबदल झेलून थोडा म्हातारा दिसत असतो। .
उरलेले उन्हाळे-पावसाळे मात्र लवकर सरुन जात असतात
ॠतुंचे अर्थही आता जाणवतील एवढे बदललेले असतात,
पण। . .
"पाहायला गेलं तर माझ्याचंसाठी काही बदललेलं नसतं,
फ़क्त पत्त्याबरोबरं तिने तिला नवं आडनाव शोधलेलं असतं। . . "
- रोहन
|
0
comments
]
0 comments
Post a Comment