होतं एक आटपाट राज्य
माझ्या मनातील स्वप्नांचं
अगणित, अवास्तव, अबोल
तरीही सुंदरशा विचारांचं
अशा या मनोराज्यात
आली एक परी
होउ का मी राणी याची
तीच मला विचारी
मी बापडा साधाभोळा
उत्तर काही न देई
हो-न करता,मुखातुन माझ्या
शब्दच फ़ुटत नाही
अकस्मात प्रत्येक गोष्टीच्या
मध्येच यायची राणी
तिच्यावाचुन या राज्याची
अपूरी रहायची कहाणी
प्रत्येक कहाणी राणी
रंगतदार बनवायची
कोण्याही कारणे मनोराज्यात
ती डेरेदाखल व्हायची
असे होता हळुहळु
राज्य हातून गेले
नकळत सारे भावविश्व माझे
तिनेच व्यापून टाकले!
-प्रणव
|
0
comments
]
0 comments
Post a Comment