अशोका। . .
[This Poem is dedicated to Great Ashoka। . .]
तो खूपदा निघायचा त्या शितिजाच्या शोधात
मागे सोडून ती लक्तरे आठवणीची। . .
पण भटकायची पावले त्या वैशाख वणव्यात
उरायची मागे फ़क्त जाणीव सावलीची। . .
कोणीच नसायाचे वाटेवर। . . एकटाच तो, एकटीच ती धाव
एकसारखीच गर्दी त्या पडक्या कबरीचीं। . .
का जिंकायचंय त्याला ह्या जगाला हरवून?
भेदरलेली कुजबूज मग त्या मुक्या तलवारींची। . .
रोजचंच युद्ध अन रोजचाच तो आकांत
रोजचीच खळखळ आता फ़ुटक्या बांगड्यांची। . .
नांदायची शांतता त्याच्या प्रत्येक पावलाबरोबर
पुसटशी ओळख मग हरवलेल्या श्वासाची
पण। . . . . . . . . . .
एके दिवशी श्वास त्याचाच त्याचाबरोबर रडला
विझवली अश्रुने त्यानं रण्भुमी कलिंगाची। .
उघडले डोळे। . . तलवार हातुन निसटून पडली
हिच होती सुरुवात त्याच्या सोनेरी विजयाची। . .
अखेरीस जिंकलाच तो। . .जिंकलच त्यानं शितिजाला
उमलली फुल त्याच्या प्रत्येक पावलाशी
आता नव्हता तो एकटा। . .नव्हे एकासाठी त्याची धाव
सापडलेली ओळख एका हरवलेल्या "अस्तित्वाची"
- रोहन
|
0
comments
]
0 comments
Post a Comment