कधी अचानक वा-राची झुळूक येते

मनाचा तळ ढवळून काढते

खोलवर कुठेतेरी दडलेल्या आठवणींना

अलगद वर आणून ठेवते ।


आणि मग आठवणींत रमतं मन

पिंजलेल्या कापसाच्या पुंजक्या सारखे

तरंगु लागते हेलकावे खात

भुतकाळाच्या वा-रावर।


प्रत्येक आठवणीपाशी क्षणभर थांबत

कधी नकळत पापणी ओली करत

कधी ओठांवर हास्य फूलवत

आठवणींचे चित्र रंगवते डोळ्यांवर ।


मग कधीतरी मन अलगद था-यावर येते

नजरे समोर पुस्तकाचे पान फडफडत असते

अन तरीही हे वेडे मन ..........


रेंगाळत असते आठवणींच्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर

0 comments

Post a Comment