रम-गम..
इथे सनम.
दुनियेला..
दाखव दम.

एक शिखर..
खिशात भर.
खिसा घट्ट..
पकडून धर.

तुझंच जंगल..
उडव दंगल.
डाव पहा..
कसा रंगल!

दगड काळीज..
पुरून टाक.
नको ऐकूस..
त्याची हाक.

0 comments

Post a Comment