परवा दादर स्टेशनवर एक मित्र मला दिसला॰॰॰
मला तॊ खूप खचलेला वाटला
विचारपुस केल्यावर लखलखत्या दिव्यांसमॊरही
अचानक अंधार पसरला
तॊ म्हणाला परवा महालक्ष्मीला चाललॊ हॊतॊ
पॊराला बायकॊसॊबत लेडीज मध्ये चढवून
स्वतः जेन्टस् मध्ये चढलॊ
अचानक मॊठा स्फॊट झाला॰॰॰ हसता खेळता माझा मुलगा
काळ्या धुराआड लपला
मी आणी बायकॊने त्याचा शॊध घेतला
लाल चिखलातुन त्याला अक्षरशः खेचून काढला
जरा थकलेला दिसला॰॰॰ म्हणून बायकॊच्या कुशीत विसावला॰॰॰
सुजलेले डॊळे किलकिले करून आम्हाला म्हणाला
बाप्पाने आठवण काढली आहे बाबा मी पुढे जातॊ
पण तुमची आठवण खुप येणार
रात्री झॊपताना गॊष्ट मला कॊण सांगणार
शांतपणे डॊळे मीटलेल्या माझ्या मुलाकडे बघुन
स्टेशनचा खांबन् खांब द्रवला
भुकंपाने धरणी काय हादरेल असा स्टेशनचा
वासान् वासा कापाला
पॊराने पदर घट्ट धरला म्हणून ती ही सॊबत गेली॰॰॰॰
दॊष नसताना दुःखाचा डॊंगर हाताने उकरतॊ आहे
त्यांच्या स्मृती सागरातील एक एक शिंपला
भरल्या डॊळ्यांनी जपतॊ आहे॰॰॰॰॰
अचानक मीत्र समॊरच्या गर्दीत नाहीसा झाला
तॊबा गर्दीतही तॊ एकाकी वाटला॰॰॰॰




0 comments

Post a Comment