धर्म,जात,राष्ट्राच्या नावे, विध्वंसाचा पाया खोदत
थडग्यामधुनि प्रेते उठली, रक्ताचे पाणवठे शोधत

गर्वाचि ते मदिरा प्याले
शब्द पेटते हाती धरले

आग पाहणे छंद तयांचा, फिरती झुंडीना संबोधत
थडग्यामधुनि प्रेते उठली...

मेंदू त्यांचा जरी सडलेला
स्वार्थ साधणे कळते त्याला

थंड सुरीने मान छाटती, असतील जेही त्यांना रोधत
थडग्यामधुनि प्रेते उठली...

करण्या आपले उखळ पांढरे
तयार केले मठ्ठ मेंढरे

असे विषारी साप पाळले, विष जयांना नाही बाधत
थडग्यामधुनि प्रेते उठली...

0 comments

Post a Comment