श्वास,प्रेम अन् अन्न-पाणी..
जगायला इतकं पुरेसं नसे ?
पैसे पैसे.. किती लागतात असे ?
हवे कशाला बंगले नी महाल ?
साध्याशा घरात समाधान वसे.
पैसे पैसे.. किती लागतात असे ?
गाड्या-घोडे, नोकर-चाकर..
यांच्यावाचुन अडतेच जसे..!
पैसे पैसे.. किती लागतात असे ?
हजार वस्तु, खर्चिक चंगळ..
सारे करूनही शांती असे ?
पैसे पैसे.. किती लागतात असे ?
आंधळ्या गरजा, अनंत इच्छा..
आपल्याच जाळ्यात माणूस फसे.
पैसे पैसे.. किती लागतात असे ?
सुख जसे.. मानावे तसे.
|
0
comments
]
0 comments
Post a Comment