हल्ली संध्याकाळी केवळ
गजरा आणुन चालत नाही
"De Beers" च्या डायमंड शिवाय
गालावर खळी खुलतच नाही!

चौपाटीवर फ़िरुन केवळ
तीचे मन आता रमत नाही
"बरिस्टात" पैसे मोजल्याशिवाय
प्रेमाची नजर मिळतच नाही!

रातराणीचा मंद दरवळ
आता तिला जवळ ओढत नाही
'चार्ली' नी 'ब्रुनो' फ़वारल्या शिवाय
रुसलेली कळी फ़ुलतच नाही!

खरच, प्रेम किती महाग झालय नाही




0 comments

Post a Comment