जग मुठीत भरताना..
आतलं गेलं सुटून.
भासात सुख शोधताना...
श्वास गेला मिटून.
आयुष्यावर माझ्या..
असा पडलो तुटून..
पहाता पहाता नेले..
मीच मला लूटून.
मोठ्या हौसे मौजेनं..
रोज पाहिलं नटून.
जमवली काडी-काडी..
बाजाराशी झटून.
खेळलो ज्याही वस्तुशी..
तीला गेलो विटून..
बोललो,ऐकले इतके..
कान गेले किटून.
कस्तुरीच्या गंधासाठी..
जगणे बसले हटून.
गंधामागे धाव-धावुनी..
उर गेला फुटून.
चोहीकडे सुंदर फुले..
दिसत होती उठुन.
सारी सारी कागदाचीच..
गंध येणार कुठुन ?
0 comments
Post a Comment