सळसळ मखमलं.. तसं मऊशार फुलं..
केसराचं रान ओलं..
काळजात शहारलं.. मन आज तरारलं.
देठातून दाटलेलं..
हळुवार मिटलेलं..
दाही दिशा वाटलेलं..
दवामधे भिजलेलं... मन आज तरारलं.
मोतियांनि सजलेलं..
मातीमधे रुजलेलं..
हसताना लाजलेलं..
अंतरात फुललेलं... मन आज तरारलं.
वा~यासवे झुललेलं..
जगावर भुललेलं..
स्पर्शामुळे खुललेलं..
स्वत:वर वेडावलं.. मन आज तरारलं
|
0
comments
]
0 comments
Post a Comment