मौनाची एक वेगळीच भाषा असते,
कळणाऱ्यालाच फक्त ती कळत असते...
शंभर वाक्य बोलण्यापेक्षा,
एका मिनिटाचं मौन बरंच काही सांगतं!
ह्र्दयात उसळणाऱ्या त्या लाटा,
डोळ्यातनं समोरच्या भिडतात,
मनापर्यंत पोहोचण्याचा,
सर्वात सोपा मार्ग शोधतात...
मन व्याकूळ होतं जेव्हा,
भावना मांडायच्या असतात जेव्हा,
मौन एक मोठं माध्यम तेव्हा,
अचूक पत्त्यावर पोहोचण्याचं,
चूकीच्या वेळी पण मौन ठेवू नका,
मनातलं दुःख मनात दाबू नका,
डोळ्यातनं आक्रोश आलं,
तर डोळे पाणावतील,
आणि समोरच्याला वाटाल तुम्ही कमकुवत,
रडणारे!मौन धारण करू नका तेव्हा,
बोलणं तेव्हा सोयस्कर!इतर वेळी मात्र,
मौनाचं आहे कबूतर!
|
0
comments
]
0 comments
Post a Comment