नाही वाटले कधीही
कुणा दुसऱ्यावरती झुरावे
तुझ्या नकाराने का माझे
जन्मांचे प्रेम सरावे?

नसते काही कळ्यांच्या
नशिबी भाग्य फ़ुलाचे
म्हणूनी का वेड्या कळ्यांनी
जन्म घेण्याचे थांबावे?

खचलो जरी मी आज
राहेन उभा नव्याने
उरी जपुन ठेवीन मात्र
माझे हे अर्धवट गाणे

जाशिल तू जिथेही
तव पायी सुख नांदावे
इतकाही स्वार्थी नव्हतो कधी मी
की तव शुभहीतही न चिंतावे!!

जा‌ईन देवाकडे जेव्हा मात्र
मांडेन माझे गाऱ्हाणे
विचारेन, इतके का शुल्लक होते माझे हे प्रेम दीवाणे?

0 comments

Post a Comment