विपत्तीमधे तू माझे रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही;

विपत्तीमधे मी भयभीत होऊ नये; हीच माझी प्रार्थना आहे.

दुःखतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचं

तू सांत्वन करावस अशी माझी अपेक्षा नाही;

दुःखावर जय मिळवता यावा,

एवढीच माझी इच्छा.

माझं तारण तू करवसं

मला तारावंस, ही माझी भावना नाही;

तरुन जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं

एवढीच माझी इच्छा.

माझं ओझं हलक करुन

तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही;

ते ओझं वहायची शक्ती माझ्यात असावी

एवढीच माझी इच्छा.

सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन, मी तुझा चेहरा ओळखावा

दुःखाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करील

तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये

एवढीच माझी इच्छा.

रविन्द्रनाथ टागोर.

0 comments

Post a Comment