हो. मी... मी..
मीच आहे रे ब्रह्म.
पहात आलो आहे..
तुझे लाखो जन्म.

जीवाचा तू तुकडा..
माझा लाडका
खास.कल्याण व्हावे
तुझे..हाच माझा ध्यास.

घडेल जे जे काही
विश्वास ठेव पक्का..
असेल भल्यासाठीच..
भले लागो झटका.

आई मारते फटका..
चुकतात जेंव्हा मुले.
दुखलं तेंव्हा तरीही..
त्यानेच होते भले.

तुझे भूत-भविष्य..
मीच लिहीले सारे.
बदलू शकशील काही..
तुला वाटते का रे ?

सोपऊन दे मजवर..
तुझ्या चिंतांचा भार.
पहा कसे सहजच..
उघडते मुक्तीचे द्वार!

0 comments

Post a Comment