त्या रणरणत्या उन्हात
एक झरा दिसला
त्या दिसलेल्या झर्याने
गारवा माझ्या मानस दिला
त्या गारव्याने दुरुनही
सुख मजला मिळत होते
पण .....
जवळ त्याच्या जाउन कळाले
ते एक म्रुगजळ होते.

त्या भयाण अंधारात
एक प्रकाश किरण दिसला
त्या प्रकाश किरणाने
मार्ग मजला दाखवला
तो मिणमिणता प्रकाशही
दिलासा मज देत होता
पण ....
त्याच्या नाहीसे होण्याने कळाले
तो एक काजवा होता .

ग्रीष्माच्या काहिलित
मंद वारयाची झुळुक आली
ती गार झुळुक
मनास हवीहवीशी वाटली
ती मंद झुळुक गारवा
मला देत होती
पण ...
नंतरच्या पडझडीने कळाले
ती वादळाची सुरुवात होती.

0 comments

Post a Comment