माझे कोडे, थोडे थोडे......... तुझ्या-माझ्या डोंगरां-मध्ये..
पाणी भर ना!
कानी हाक येता माझी..
झणी तैर ना!

तुझ्या तळव्यावरच्या रेषा..
सोलून दे ना!
मोजून तागडीत माझ्या बस..
तोलून घे ना!

माझे कोडे थोडे थोडे..
यारा सोडव ना!
पारा वादळाचा चढता..
वारा थोपव ना!

तिजोरीची कळ दाबून..
हाSजी खोल ना!
माझी कळ कळण्या,
माझी..ओझी पेल ना!

अदृश्यशी वहाण माझी..
घालून देख ना!
चालून फाटले कातडे तर..
सोलून फेक ना!

0 comments

Post a Comment