यार तु फार डिप्लोमॅटीक आहेस.'' यासारखं डिप्लोमॅटीक दुसरं वाक्य नसेल. कारण खरंतर त्याला म्हणायचे असते की ..."" साल्या ... तु फार हरामी आहेस.'' तशी डिप्लोमसीची जर 'डीप्लोमॅटीक' व्याख्या करायची असेल तर त्याचा अर्थ होतो ... टॅक्टीकली वागने की जेणेकरुन त्यात सगळ्यांच हित साधलं जाईल. पण आजच्या काळानुसार डिप्लोमसीचा अर्थ होतो. .... "मुहं मे राम बगल में छुरी'. किंवा मनातली गोष्ट चेहऱ्यावर दिसू न देणे. काही लोक तर त्याच्याही पुढे जावून - ते मनात काही, चेहऱ्यावर काही, बोलण्यात काही, आणि आचरणात अजुनच काही, अशी वागतात. हं ही वेगळी गोष्ट आहे की त्याचे परीणाम मात्र वेगळेच काहीतरी होतात. आणि विश्वास ठेवा की आजचा काळच असा काही आहे की जर तुम्ही डिप्लोमॅटीक नसाल तर तुमचं काही खरं नाही. आता काय सांगायचं, की आपण कुणाशी मोकळेपणाने हसु पण शकत नाही. हसलात तर फसलात. कुणाशी जर चूकुन मोकळेपणाने हसलात तर तो तुम्हाला कुठेतरी नेवून बकऱ्यासारखं कापणार. काही दिवस तर तुम्ही हंसणं सुध्दा विसरुन जाल. कुणी हसलं तर काही जणांना वाटतं की अरे हा काय थील्लर माणूस आहे, मुर्खासारखा हसतो!. ऑफिसमध्ये हसु शकत नाही... कुण्या सुंदरीचं काम आपल्या गळ्यात पडण्याची शक्यता असते.... घरात हसू शकत नाही... खिसा रिकामा होण्याची भिती असते. त्यामुळेच कदाचित आजकाल लाफ्टर क्लबमध्ये लोकांची जरा जास्तच गर्दी जमत आहे.

मी असाच आज सकाळी सकाळी लाफ्टर क्लबकडे निघालो होतो. रस्त्याच्या पलिकडून एक माणूस येतांना दिसला. तसा तो नेहमीच लाफ्टर क्लबमध्ये दिसायचा. नजरानजर होताच मी त्याला एक गोड स्माईल दिलं आणि आश्चर्य म्हणजे त्यानेही माझ्या गोड स्माईलला गोड स्माईलनेच उत्तर दिलं... कारण आजकाल असं फार कमी बघायला मिळतं.

"" तुम्ही काय या कॉलनीत राहाता ? '' मी विचारलं.

"" हो ... तुम्ही कुठे राहाता?'' त्याने विचारले.

"" ते तिकडे तुमच्या शेजारच्याच कॉलनीत'' मी उत्तर दिलं.

एकाच बिल्डींगमध्ये समोरा समोर राहणारे शेजारीही जर अश्या गप्पा करु लागले... तर आजकाल आश्चर्य वाटायला नको.

गप्पा वाढता वाढता ... कुठे काम करता.... घरात कोण कोण काम करतं... पासून किती पॅकेज मिळतो इथपर्यंत जावून पोहोचल्या. मग इन्कम टॅक्सचा सरल फॉर्म भरला का? ... त्यात कोणतं डिडक्शन दाखवलं .. वैगेरे वैगेरे. त्या सरल फॉर्मच्या बाबतीत मला नेहमीच एक प्रश्न पडतो की ... इतक्या किचकट फॉर्मला सरल कोणत्या दृष्टीकोणातून म्हणतात काही कळत नाही.?

मग गप्पांचा विषय बदलून आज माणसाने किती प्रगती केली या विषयावर येवून थांबला. त्या माणसाचं म्हणणं होतं की आज माणूस चंद्राच्याही पुढे मंगळावर जाण्याचा विचार करतो आहे. फोन टीव्ही मोबाईल इन्टरनेट च्या सहाय्याने माणूस कितीही जरी दूर असला तरी क्षणात संपर्क होवू शकतो. वैगेरे वैगेरे....

मी म्हटलं ही कसली प्रगती? याला काय प्रगती म्हणतात? ...

एवढ्यात लाफ्टरक्लब आला आणि आमच्या गप्पा तेवढ्यापुरत्या थांबल्या...

क्रमश:...

0 comments

Post a Comment