रे लाख प्रयत्न करा तुम्ही
सफल एकही होणार नाही
राज साहेबांना रोखू शकाल इतकी
तुमच्यात मुळी ताकदच नाही.
भले घाला भाषणबंदी,
कितीही पाठवा नोटिसा,
तुमच्या असल्या प्रेमपत्रांना
जा ! आम्ही भीक पण घालत नाही .
छळुनी आमच्या मराठी मनास
दुसरे आणखी काय मिळवाल ?
आज आहात,
उद्या होत्याचे नव्हते व्हाल!
पुरवून परप्रान्तियांचे चोचले,
करतोस त्यांचे लाड,
उत्तरप्रदेशदिन करुन साजरा
म्हणे,
शिवसेना करेल मराठीजनांचा प्रतिपाळ,
उध्दवा अजब तुझा कारभार !
फक्त महाराष्ट्रदिनच होईल साजरा,
भलते सलते काही चालवून घेणार नाही,
सरळ सांगुन कळत असेल तर ठिक,
नाहीतर तुम्हाला समजावणेही येते आम्हाला!
यापुढे महाराष्ट्रात असेल
फक्त एकच आवाज,
दुर्जनांचा करुनी नाश,
जो करेल महाराष्ट्र नवनिर्माण
तोच आहे आमचा
"मराठीह्रदयसम्राट राज!
|
0
comments
]
0 comments
Post a Comment