'राजकारणात अंगाला तेल लावलेले पैलवान असतात, हातीच येत नाहीत. आज सकाळीच वर्तमानपत्र पाहत होतो. सगळीकडे शरद पवार साहेबांची वेगवेगळी स्टेटमेंट. एकात म्हणतात 'शिवसेनेशी युती नाही', दुसऱ्यात म्हणतात 'बीजेपी सोडून कुणाशीही युती' तिसरीकडे तिसरंच. मी म्हटलं किमान होकायंत्र दिशा तरी दाखवतं. हे तर धोकायंत्रच आहेत. दिशा कुठची काहीच माहित नाही', अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीतला पहिला फटाका नाशिकला फोडला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार स्वयंरोजगार विभागाच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त नाशिकच्या कालिदास कलामंदिरात आयोजित बेरोजगार मेळाव्यात खच्चून गदीर् केलेल्या तरुणांशी राज यांनी संवाद साधला. त्याआधी बुधवारी नाशिकला आल्यावर राज यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची गोपनीय बैठक घेऊन त्यांना खडे बोल सुनावले. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भोजपुरी कार्यक्रम उधळून लावल्याच्या गुन्ह्याखाली मध्यवतीर् कारागृहात असलेल्या मनसे कार्यर्कत्यांनाही जाऊन राज भेटले. 'आता तुम्हालाच काहीतरी करावं लागेल', असं सांगत राज यांनी उपस्थित बेरोजगारांनाही शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या. पवारांवरील टिकेचा सूर पुढे नेत राज म्हणाले, 'यांची दिशा कुठली ते काहीच माहित नाही. आता तर हे समाजवादी पाटीर्सोबत. त्यामुळे इथं जी बजबजपुरी माजते आहे, त्याबद्दल कुणी काही बोलणार नाहीत.' परप्रांतियांच्या घुसखोरीबाबत ते म्हणाले, 'कशा प्रकारच्या गोष्टी आत शिरत आहेत यावर तुम्ही बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. उद्या या रोजगाराच्या संधी तुम्हाला मिळाल्या पाहिजेत. तुमच्यावर सतत आपलेच लोक आरोप करतात की 'आमची मुलं काम करत नाहीत. अरेरावी करतात. गावाला निघून जातात. युनियन तयार करतात. 'ते' बाहेरचे काहीच करत नाहीत.' आपल्यावर हा जो कलंक आहे तो आपणच मिटवला पाहिजे. आपणच घालवला पाहिजे. तुम्हीच ही गोष्ट सिद्ध केली पाहिजे की, 'तुम्ही म्हणतायत तसे आम्ही नाही आहोत. आम्ही काम करू शकतो. कंपनी जगवू शकतो. मोठी करू शकतो.' मंदीच्या सावटाची जाणीव तरुणांना करून देत राज म्हणाले की, 'काही वेळेला आपल्याला दोन पावलं मागे यावं लागतं. कधी कंपनीला दोन पावलं मागे जावं लागतं. मोडेन पण वाकणार नाही, कशासाठी? परिस्थिती पाहिली तर सगळं मोडूनच पडलंय की. तुम्हालाच काहीतरी करावं लागेल. नुसती अशी स्वयंरोजगार प्रदर्शनं भरवायची, ब्रोशर वाचायची, यातून काही होणार नाही. आतूनच तसं वाटलं पाहिजे.
|
0
comments
]
0 comments
Post a Comment